Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेतकऱ्याचा तहसिल कार्यालयच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न

 वैजापूर


    शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने नादी (ता. वैजापूर) येथील वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी दुपारी तहसिल कार्यालयाच्या आवारात घडली. रानु संताराम हजारे (७०) असे या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. महसुल कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाल करुन वृद्ध शेतकऱ्याला पकडुन त्याच्याजवळ असलेली विषारी औषधाची बाटली ताब्यात घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेबाबत अधिक माहिती अशी कि, वैजापूर तालुक्यातील नादी येथील रानु हजारे या शेतकऱ्याची डाकपिंपळगाव रस्त्यावर नादी शिवारात शेतजमीन आहे. 

        शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी तहसिल कार्यालयात अर्ज दाखल केला होता. २०१२-१३ मध्ये वैजापुरच्या तत्कालिन तहसिलदार सारिका शिंदे यांनी हजारे यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मोकळा करुन देण्याचे आदेश दिले होते. मात्र या निर्णयाविरोधात विरोधी पार्टीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. तेव्हापासुन रानु हजारे यांची रस्त्यासाठी न्यायालयिन लढाई सुरु आहे. रानु हजारे शुक्रवारी दुपारी विषारी औषधाची बाटली घेऊन तहसिल कार्यालयात पोहचले. वैजापुर सजाचे तलाठी रामेश्वर पेहरकर व पारस पेटारे यांनी हजारे यांच्या हातातील औषधाची बाटली पाहिली. त्यांनी तातडीने धाव घेऊन हजारे यांना पकडले व औषधाची बाटली ताब्यात घेतली. त्यानंतर नायब तहसिलदार महाजन यांनी त्यांची समजुत काढली. त्यामुळे प्रकरण तात्पुरते मिटले.