वैजापूर भारती कदम
वैजापूर- सामाईक बांध कोरल्याच्या कारणावरून वृद्ध महीलेस दीर व पुतण्यांनी विळा व लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले.ही घटना शनिवारी तालुक्यातील सटाणा येथे घडली.या प्रकरणी चार जणांविरुद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.निर्मला ज्ञानदेव बोरनारे (६५) या त्यांच्या सटाणा शिवारातील गट नंबर ४९ मध्ये काम करीत होत्या.सोबत त्यांच्या दोन सुनाही होत्या.
तसेच मुलगा ट्रक्टरने शेत नांगरत होता.त्यावेळी निर्मला बाई यांचे दिर व पुतणे तेथे आले.तुम्ही आमचा सामाईक बांध कोरला आहे.असे म्हणून त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.निर्मलाबाई या समजावून सांगण्यास गेल्या असता,त्यांना विळ्याने मारून जखमी करण्यात आले.त्यावेळी निर्मला बाई या जमीनीवर पडल्या.त्यावेळी निर्मला बाई यांचा मुलगा व सुना तेथे आले.त्यांनाही लाकडाने जबर मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली.तसेच तुझ्या मुलाला करंट देवून मारुन टाकतो.अशी धमकी दिली.या प्रकरणी निर्मला बाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोकुळ भाऊराव बोरनारे,अमोल गोकुळ बोरनारे ,सागर गोकुळ बोरनारे व अतुल गोकुळ बोरनारे या चार जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.