सटाणा प्रतिनिधी भुषण वाघ
गेल्या दोन वर्षी पासून कोरोना मुळे रद्द केलेल्या देव मामलेदार यशवंत राव महाराज यांचा रथ उत्सव ह्या वर्षी मात्र साधेपणाने आणि कोरोना नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. आज देव मामलेदार यशवंत राव महाराज यांच्या पुण्यतीथीचे औचित्य साधून भल्या पहाटे तहसीलदार श्री जितेंद्र इंगळे यांनी सपत्नीक पूजा करून उत्सवाला सुरुवात केली. भल्या पहाटे टाळ मृदुंगाच्या गजरात ह्या आरती व पूजे साठी मोठ्या संख्येने बागलाण कर उपस्थित होते.
मात्र या वर्षीही कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमूळे यात्रेला प्रशासनाने परवानगी नाकारली. म्हणूनच बागलाणकरांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. तसेच लहान व्यापाऱ्यांवर सुद्धा यामुळे संक्रांत कोसळली आहे. कोरोनाचे हे संकट लवकर दुर व्हावे असे साकडे तहसीलदार श्री जितेंद्र इंगळे यांनी देव मामलेदार यांच्या चरणी घातले.