वैजापूर भारती कदम
वैजापूर-दारू पिऊन पत्नीला बेल्टने मारहाण करून जखमी केल्याची घटना शहरातील नवजिवन काॅलनी भागात गुरूवारी घडली .या प्रकरणी पती,दिर व सासरा अशा सासरच्या तीन जणांविरुद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.अश्वीनी रितेश जोशी असे या घटनेतील जखमी महीलेचे नाव आहे.तिच्या सासरचे लोक तिला काही दिवसांपासून त्रास देत आहे.गुरूवारी ती घरात बसलेली असताना तिचा पती रितेश व दीर रुपेश हे घरी दारू पिऊन आले.त्यांनी लगेच अश्वीनीला शिव्या देण्यास सुरुवात केली.
ती काही समजण्याच्या आतच तिच्या सासऱ्याने तिचे केस धरून तिला भिंतीवर लोटले.तर पतीने कमरेचा बेल्ट काढून तिला मारहाण करून जखमी केले.तसेच तिघांनीही लाथा बुक्क्यांनी तिला मारहाण केली.तसेच शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.तु या घरातून निघून जा .असेही सांगितले.या प्रकरणी अश्वीनी रितेश जोशी हिने दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती रितेश शरद जोशी,दिर रुपेश शरद जोशी व सासरा शरद शंकरराव जोशी सर्व रा.नवजिवन काॅलनी वैजापूर या तीन जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.