Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दारूची बाटली दिली नाही म्हणून तरुणाचा खून

 प्रतिनिधी/ महेश साळुंके

     निफाड- तालुक्यातील शिंगवे गावात खंडेराव मंदिर परिसरात दारूची बाटली दिली नाही म्हणून तरुणाचा खून करण्यात आला आहे. सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू काद्री यांनी अधिक माहिती दिली की शिंगवे येथे गुरुवारी बाजार असतो या दिवशी खंडेराव मंदिराजवळ संशयितआरोपी दिलीप निवृत्ती पवार याने दत्तू चंदर अष्टेकर (३२) याच्याकडे दारूची बाटली मागितली 

      पण त्याने न दिल्याने या दोघांत भांडण झाले व भांडणाचे रूपांतर धक्का बुक्कीत होऊन भांडणाच्या वादात हातातील दारूची बाटली दत्तूच्या पोटात घुसली व याचा मृत्यू झाला. सदर घटनेचा ३०२ कलमा प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. सा.पो.निरीक्षक काद्री यांनी सांगितले. शिंगवे येथील खुनाची माहिती मिळताच निफाड उपविभागीय पोलिस अधीक्षक सोमनाथ तांबे व सायखेडा सा.पो.निरीक्षक पप्पू काद्री यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या घटनेची माहिती घेऊन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश आखाडे, पोलिस कर्मचारी विकास गीते, तेलोरे, निकम, अधिक तपास करत आहे.