वैजापूर प्रतिनिधि भारती कदम
वैजापूर- तालुक्यातील गोदावरी पट्ट्यात मंगळवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली.त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा,कापूस, हरभरा , ज्वारी,तुर आदी पिकांचे नुकसान झाले.दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोदावरी नदी काठच्या परीसरात काळेकुट्ट ढग दाटून आले होते.चार वाजेच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसास सुरूवात झाली.त्यानंतर जोरदार गारपीट झाली.
जवळपास पंधरा मिनिटे गारपीट सुरूच होती.गोदावरी काठच्या श्रीरामपूर भागातील गावांनाही गारपीटीचा तडाखा बसला.तालुक्यातील नागमठाण,चेंडुफळ, अव्वलगाव,हमरापूर,गाढे पिंपळगाव,बाजाठाण,चांदेगाव , डाग पिंपळगाव आदी गावांत गारपीट झाली.या गारपीटीचा काढणीला आलेल्या पिकांना फटका बसला.सर्वाधीक फटका कांदा रोपांना बसला.गारपीटिमुळे रात्री गारवा निर्माण झाला होता.दोन दिवस गारपीटीचा अंदाज वर्तविण्यात येत असल्याने शेतकरी वर्ग चांगलाच भयभीत झाला आहे.