वैजापूर भारती कदम
वैजापूर- तालुक्यातील बाभुळगाव बुद्रुक येथील एका इसमाने गुरूवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.गौतम भिवा तेझाड (४०) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.त्यांनी आपल्या राहत्या घरी पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपवली.त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.शिवूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.या प्रकरणी आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस नाईक धनेधर हे करीत आहेत.