Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सोमनाथ चौधरी तर सरचिटनिसपदी निलेश देसाई



प्रतिनिधी/महेश साळुंके

        लासलगाव-नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाशी( रजि. )सलग्न असलेल्या  निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी सोमनाथ चौधरी, कार्याध्यक्षपदी योगेश अडसरे तर सरचिटनिसपदी निलेश देसाई  यांचेसह कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली 

     निफाड येथील शासकिय विश्रामगृहावर सकाळी ११ वाजता निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्या सर्व सभासदांची बैठक बोलविण्यात आली होती यावेळी  सन २०२२-२४ या सालासाठी कार्यकारणीची निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार तर सह निवडणुक अधिकारी म्हणुन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे यांनी काम पाहिले सर्वानुमते निफाड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपदी सोमनाथ चौधरी कार्याध्यक्षपदी योगेश अडसरे उपाध्यक्षपदी सुभाष गायकवाड ,उत्तमराव गोसावी,सरचिटणीसपदी निलेश देसाई सहचिटणीसपदी रोहीत राजोळे,खजिनदारपदी सागर निकाळे ,सहखजिनदारपदी राकेश बनकर,संघटकपदी तुषार झोडगे,सहसंघटकपदी सागर आहेर समन्वयकपदी राहुल कुलकर्णी, सदस्यपदी अण्णासाहेब गुरगुडे,‌दिपक कदम,दिपक घायाळ,,संजय भागवत ,पंढरीनाथ सोनवणे  यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
        याप्रसंगी जेष्ठ पत्रकार अँड शेखर देसाई ,मावळते अध्यक्ष मानिक देसाई ,बाजीराव कमानकर यांनी मनोगत व्यक्त केले नवनिर्वाचित कार्याकारणीचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला यावेळी हारुण शेख, अरुण खांगळ, नितिन गायकवाड  उमेश पारिख, समीर पठाण अँड रामनाथ शिंदे, शरद जाधव ,असिफ‌ पठाण,कृष्णा अष्टेकर,बाजीराव कमानकर, किशोर सोमवंशी,विनोद गायकवाड मच्छींद्र साळुंके ,महेश साळुंके,अमोल गायकवाड , गणेश शेवरे ,गिरीश बिडवई ,आकाश गायखे,शरद लोहकरे ,मुकुंद भडांगे ,राहुल गायकवाड आदींसह पत्रकार उपस्थित होते