निफाड
निफाड नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज १७ जागांपैकी ३ आरक्षित जागा वगळता १४ प्रभागातील १४ जागासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली यामध्ये एकूण १४०३० मतदारांपैकी १०३३२ मतदारानी मतदान करुन आपला लोकशाही प्रणालीतील पवित्र हक्क बजावला यामध्ये ७३-६४ टक्के मतदान झाले २७ मतदान बुथवर मतदान शांततेत पार पडले.दिवसभर कुठेही शांतता भंग होऊ नये म्हणून निफाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता
निफाड नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी बहुजन समाज पार्टी निफाड शहर विकास आघाडी शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून तर काही अपक्ष निवडणूक रिंगणात उभे होते आज निफाड नगरपंचायत साठी झालेल्या मतदान प्रक्रियेत अतिशय शांततेत मतदान झाले निफाड नगरपंचायतीच्या सतरा प्रभागासाठी घोषित झालेली ही निवडणूक नंतर न्यायालयाच्या आदेशान्वये तीन प्रभागासाठी आरक्षित जागेसाठी होणाऱ्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या उर्वरित 14 प्रभागासाठी४३ उमेदवारांनी निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावण्यासाठी प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता
अतिशय कमी दिवसात प्रभागात प्रचार करणे गाठीभेटी घेणे हे उमेदवार पुढे मोठे जिकरीचे काम होते नगरपंचायतीच्या १४ प्रभागातील १४ हजार ३० मतदारांपैकी १० हजार ३३२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा सन्मान केला आहे १४ प्रभागासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेची मतमोजणी पुढील महिन्यात १९ तारखेला होणार आहे अशी माहीती निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे दरम्यान निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून प्रांताधिकारी डॉक्टर अर्चना पठारे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी तहसीलदार शरद घोरपडे सहाय्यक निवडणूक अधिकारी भटू पाटील निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगाराव सानप नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी श्रिया देवचके ये प्रयत्नशील होते