वैजापूर भारती कदम
खंडाळा (ता. वैजापूर) जिल्हा परिषद गटास मंजुरी द्या अशी मागणी खंडाळा येथील ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्याकडे केली आहे. त्यांनी याबाबत गुरुवारी निवेदन दिले. २०१७ पूर्वी खंडाळा जिल्हा परिषद गट अस्तित्वात होता परंतु निवडणूक विभागाने सन २०१७ च्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत वाकला गटास मान्यता देऊन खंडाळा गट रद्द करुन शिऊर गटास जोडला.
या जिल्हा परिषद गटात यापूर्वी खंडाळा, जानेफळ, कोल्ही, आलापुरवाडी, कोरडगाव ,हिलालपूर, पाराळा, भादली, तलवाडा, चिकटगाव, खरज ,लोणी खु , वाकला, तित्तरखेडा, वडजी, या गावांचा समावेश होता. नवीन जिल्हा परिषद गटामध्ये खंडाळा परिसरातील आजु बाजुच्या गावांचा समावेश करुन खंडाळा जिल्हा परिषद गटास मान्यता देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या निवेदनावर प्रकाश वाघचौरे, मुरलीधर थोरात, राजेंद्र जानराव, काशिनाथ बागुल, दिलीप जाधव, शांताराम वेळंजकर, ग्रा.पं. सदस्य संदीप पवार, शिवाजी जाधव, भालचंद्र बागुल,ताराचंद वेळंजकर , रज्जाक शेख आदी सह ग्रामस्थांच्या साक्षऱ्या आहेत.