तालुक्यातील चिंचडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले . त्यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद व प्रमुख पाहुण्यांनी सामूहिकपणे संविधान उद्देश्यपत्रिकेचे वाचन केले.. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी शाळेतील बाबासाहेब वाघ,विलास तांबे, मंगेश पाटील, त्र्यंबकेश्वर मोईन, रूपाली बागूल, राजश्री बंड, मंगल चव्हाण, जयश्री कोळसे- मोईन, प्रगती शेंडे आदींची उपस्थिती होती.