वैजापूर
कृषि उत्पन्न बाजार समितीचे सहायक सचिव पंजाबराव मच्छिंद्रनाथ थोरात ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल बाजार समितीतर्फे त्यांचा सपत्निक सत्कार करुन निरोप देण्यात आला. बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये शेतकरी हॉलमध्ये बुधवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. बाजार समितीचे सभापती भागिनाथ मगर, संचालक संजय निकम ज्ञानेश्वर जगताप, रावसाहेब जगताप, दिगंबर खंडागळे, राजेंद्र कराळे, रिखबचंद पाटणी, सुरेश तांबे, सुभाष आव्हाळे, बाबासाहेब गायकवाड, हिराबाई गायकवाड, सचिव विजय सिनगर, पी.के. मोटे, डी.पी. शिंदे, वाय.एस. हाडोळे, सी.ए. मते, डी.जे. राऊत, एस.पी. निकम, ए.आर.शेख, वाय.बी. मगर यांच्यासह उल्हास ठोंबरे, अॅड. रमेश सावंत, चंद्रकांत मोटे,अशोक थोरात, नानासाहेब थोरात, सुभाष पाटील, राजेंद्र थोरात, रेवणनाथ थोरात, राजेंद्र गायके, कांदा मार्केट व भुसार मार्केटमधील व्यापारी, हमाल मापाडी, शेतकरी उपस्थित होते.