भिम लहुजी महासंग्रामच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या |
अहमदनगर -शिवराय फुले शाहु आंबेडकर साठे तसेच मानवमुक्तीच्या लढ्यात योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या विचारांचा जागर करणारी प्रबोधनाची मांदियाळी सुरू ठेवली पाहिजे.त्यास अनुसरून पदाधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे.पदाच्या माध्यमातून तळागाळातील वंचित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्य करावे,असे प्रतिपादन विनोद वैरागर यांनी केले.
नगर शहरात एका सामाजिक कार्यक्रमात आले असता ते बोलत होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी भिम लहुजी महासंग्राम सामाजिक संघटनेच्या अहमदनगर शहराच्या विभागासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करून कार्यकारणी जाहीर करण्यात आली.प्रसंगी महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या हस्ते तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद वैरागर व माजी नगरसेवक अनिल शेकटकर व भगवान जगताप यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी सुनिल उमाप (प्रदेश उपाध्यक्ष),सुनिल सकट (जिल्हाध्यक्ष),गणेश ढोबळे(नगर तालुका प्रमुख),अशोक भोसले(श5जरeD5दट्झ5हराध्यक्ष) तर दिलीप जाधव (शहर उपाध्यक्ष) आदी पदाधिकाऱ्यांची निवड करून सत्कार करण्यात आला.तसेच महापुरुषांच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी आणि वाचन संस्कृती जगली पाहिजे यासाठी नुतन पदाधिकाऱ्यांना पुस्तके भेट देण्यात आली.
प्रसंगी समाजाच्या न्याय हक्कासाठी व प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न करु असे नुतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले