भारती कदम
वैजापूर- शहरानजीक मुंबई नागपूर महामार्गावर बेकायदेशीर रित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या एका जणास पोलीसांनी रविवारी अटक केली.चेतन अंबादास शिंदे (२२) असे आरोपीचे नाव आहे.तो मुळचा चांदवड येथील रहिवासी असून तो वैजापूर येथे राहत आहे.तो शेतकरी हाॅटेलच्या बाजूला देशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्या आधारे ही कारवाई करण्यात आली
.त्याच्या ताब्यातून २हजार ४५० रुपये किंमतीच्या ३७ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.या प्रकरणी पोलिस नाईक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चेतन शिंदे याच्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस नाईक सिंगल हे करीत आहेत.