प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर :- ठाणे येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत येथील सोनू राजपूत या तरुणाने नेत्रदीपक कामगिरी करत स्पर्धेत चतुर्थ मानाकंन मिळवले.
रविवार (ता.२६) रोजी ठाणे येथील कल्याणनगर मध्ये पार पडलेल्या या स्पर्धेसाठी राज्यातील मुंबई, ठाणे, अमरावती, पनवेल, नाशिक, औरंगाबाद आदी ठिकाणचे एकूण २०० स्पर्धक सामील झाले होते. पैकी सोनू राजपूत यांंनी विशिष्ट गटात चतुर्थ मानांंकन मिळवले. यावेळी आयोजकांच्यावतीने त्यांना पारितोषिक, शाल, श्रीफळ देऊन त्यांंचा सत्कार करण्यात आला. या अगोदरही विविध राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. सोनू राजपूत यांच्या या कामगिरीबद्दल माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, जिल्हा बँकेचे संचालक डॉ दिनेश परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान, धीरज राजपूत, संजय राजपूत, योगेश राजपूत, प्रेम राजपूत, मनोज राजपूत,सोमू सोमवंशी, योगेश पुंडे, शैलेश पोंंदे, जीतू राजपूत, सागर राजपूत, अमोल राजपूत, कुणाल राजपूत, स्वप्नील राजपूत, संदीप पवार आदींंनी त्यांचे अभिनंदन केले.
फोटो सह