वैजापूर भारती कदम
वैजापूर- तालुक्यातील शिवूर हद्दीत चोरट्यांनी धुमाळ घातला आहे.शनिवारी रात्री पोलीस स्टेशन जवळील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी पोलीसांना चांगलेच आवाहन दिले आहे.काही दिवसांपासून चोरटे शिवूर भागात सक्रीय झाले आहे.मात्र चोऱ्या रोखण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत आहे.त्यामुळे नागरीकांचा रोष वाढत आहे.शनिवारी रात्री तर चोरट्यांनी पोलीस स्टेशन जवळील तीन दुकाने फोडली.त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने किती ऐवज चोरीला गेला हे मात्र समजू शकले नाही.रविवारी देखील शिवूर पोलीस ठाण्या पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मंगलकार्यालयातून दुचाकीची चोरी झाली आहे.