Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मानव- वन्यजीव संघर्ष कायमस्वरुपी टाळण्यासाठी पालक मंत्री सतेज उर्फ बंटी डी पाटील आढावा बैठक



 कोल्हापूर शहर परिसरातील मानवी वस्तीत गव्याचा वावर वाढल्याचे पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे अधिकाऱ्यांसोबत पालक मंत्री सतेज उर्फ बंटी डी पाटील ह्यांनी आढावा बैठक घेतली.   बैठकीनंतर बोलताना पालक मंत्री सतेज उर्फ बंटी डी पाटील ह्यानी गव्याच्या हल्ल्यात जिल्ह्यातील दुर्दैवाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे दुर्घटना घडू नये व मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कायमस्वरुपी   ओरिसा राज्याच्या वनविभागाकडून माहिती घेण्याच्या सूचना  देण्यात आल्या असल्याने अशा उपाययोजनांमुळे जंगली प्राणि व मानव संघर्ष कमी होण्यास मदत होईल.


              तसेच पन्हाळा तालुक्यातील कळे येथे दलदलीत अडकलेल्या जखमी झालेल्या एका गव्याचा मृत्यू झाला असून कोल्हापूर शहर परिसरात दोन रानगवे आढळून आले होते. हे गवे पुन्हा त्यांच्या अधिवासात परत गेले आहेत. वन्यप्राणी मानवी वस्तीत आल्याचे आढळल्यास अथवा वनविभागाशी संबंधित काही माहिती हवी असल्यास यासाठी 'हॅलो फॉरेस्ट 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे नागरीकांना अवाहन करणेत आले आहे.

यावेळी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, उपवनसंरक्षक रावसाहेब काळे, करवीरचे वन परीक्षेत्र अधिकारी रमेश कांबळे आदी उपस्थित होते.