वैजापूर भारती कदम
वैजापूर- मोटार सायकल स्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता व ठेकेदाराविरूद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.भोपेवाडी नागद ता.कन्नड येथील समाधान गोविंद आहीरे (४३) या मेंढपाळाच्या मृत्यूस दोघे कारणीभूत ठरले आहेत.आहीरे यांच्या वैजापूर तालुक्यातील जरूळ येथे मेंढ्या होत्या.ते जरूळ येथून १३ डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गावाकडे जात होते.त्यावेळी खंडाळा गावाजवळ बोर नदीचा पुल व दुभाजकावर त्यांची मोटारसायकल धडकून त्यांचा जागेवर मृत्यू झाला.वैजापूर ते शिवूर जाणारा रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग आहे.
त्याचे शिवूर पर्यंत नवीन बांधकाम झाले आहे.परंतू खंडाळा गावाजवळ धोकादायक रित्या पुलाचे व दुभाजकाचे काम करण्यात आले आहे.या धोकादायक बांधकामास कार्यकारी अभियंता व ठेकेदार कारणीभूत आहे.त्यामुळे मयत यांचा मुलगा वाल्मीक समाधान आहीरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता व ठेकेदार गंगामाई कन्स्ट्रक्शन या दोघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.