Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ऐतिहासिक बिंदू चौकाच्या सुशोभीकरणाबाबत पालक मंत्री सतेज उर्फ बंटी डी पाटील ह्यांची अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन चर्चा व पाहणी


      कोल्हापुर शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या ऐतिहासिक बिंदू चौकाच्या सुशोभीकरणाबाबत आज पालक मंत्री सतेज उर्फ बंटी डी पाटील ह्यांनी आज अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन चर्चा व पाहणी केली. ह्या वेळी बोलताना पालक मंत्री सतेज उर्फ बंटी डी पाटील यांनी बोलताना सांगितले   सामाजिक आणि स्वातंत्र्याच्या क्रांतीचा साक्षीदार असलेल्या बिंदू चौकाचा समावेश वारसा स्थळात असून याचे सुशोभीकरण करण्यासाठीचा सविस्तर आराखडा तात्काळ तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या असलेचे सांगितले.



           भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीतील तयार केलेला भारतातील एकमेव पुतळा अशी बिंदू चौकातील पुतळ्याची ओळख आहे. ९ डिसेंबर १९५० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले या दोन महापुरुषांचे पुतळे चौकात बसवण्यात आले. तेव्हापासून  स्वातंत्र्य लढ्यातील हौताम्यांचा साक्षीदार असलेला हा चाैक सामाजिक क्रांतीला प्रेरणा देत आहे.  देशभरातील पर्यटक तसेच आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी भेट देतात. त्यामुळे, बिंदू चौकाचे सुशोभीकरण होणे गरजेचे असून खऱ्या अर्थना शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा सर्वांना मिळेल आणि त्यांचे विचार पुढे जातील. या सुशोभीकरणासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून या ठिकाणी व्हर्टिकल गार्डन व आकर्षक माहिती असलेला फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यावेळी, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, शहारअभियंता नेत्रदीप सरनोबत, उदय गायकवाड, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, डीगे फौंडेशनचे सदानंद डिगे, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, आदिल फरास, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, मुस्लिम बोर्डिंग चे चेअरमन गणी आजरेकर अशपाक आजरेकर, संदीप चौगुले, आरपीआय महिला आघाडीच्या रूपाताई वायदंडे, कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पवार, रमेश मोरे यांच्यासह आदी उपस्थित होते.