चिखली प्रतिनिधी
रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई यांच्या प्रवेशानंतर बुलडाणा जिल्ह्यातील रिपब्लिकन सेनेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले भाई विजयकांत गवई यांनी गाव तेथे शाखा तालुका तिथे कार्यालयं उद्दिष्ट ठेवून चिखली तालुका सर करीत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रिपब्लिकन सेनेच्या तालुकास्तरीय कार्यकारणी गठित करण्यासाठीं मोर्चे बांधणीला सुरुवात केली त्यांच्या दमदार व्यक्तिमत्त्व व रिपब्लिकन सेनेच्या सिद्धांतावर विश्र्वास ठेवून सामजिक व राजकिय बदल घडविण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी दिनांक १३/१२/२०२१ रोजी चिखली येथिल कृषि उत्पन्न बाजार समिती शेतकरी भवनात रिपब्लिक सेनेच्या कार्यक्रमात बुलडाणा जिल्हाभरातून स्वयफुर्तीने आलेल्या इच्छुकांनी प्रवेश केला.
सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे साहेब, विदर्भ अध्यक्ष योगेन्द्र चवरे ,प्रदेश उपाध्यक्ष मुजीब भाई पठाण, युवा प्रदेशाध्यक्ष किरणभाऊ घोंगडे, युवा प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खरात या मान्यवरांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेने मध्ये असंख्य कार्यकर्त्यांना प्रवेशसह पदानियुक्ती देण्यात आली.प्रत्येक माणसाच्या मनामनात प्रत्येकाच्या घराघरात पोचवण्याचे काम रिपब्लिकन सेनेने केले पाहिजे असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले. रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे साहेब, योगेंद्र चवरे साहेब, मुजीब भाई पठाण, किरण भाऊ घोंगडे, अनिल गवई यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षाच्या कार्यकर्ते यांनी रिपब्लिकन सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष व ईतर जिल्ह्यातून आलेल्या मान्यवरांच्या हस्ते कार्यकर्त्यांचा सत्कार करून प्रवेश करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी ब्रह्मभाऊ साळवे बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्षपदी सलीम भाई , लोणार तालुका अध्यक्षपदी अशोक जावळे, बुलढाणा शहर अध्यक्षपदी सोनू हिवाळे, बुलढाणा शहर सचिवपदी भीमराव दाभाडे, शहर उपाध्यक्षपदी शेख हसन ,चिखली शहर उपाध्यक्षपदी रमेश अंभोरे, चिखली शहर उपाध्यक्षपदी सतीश पवार, चिखली शहर कार्याध्यक्षपदी सतीश इंगळे, चिखली तालुका उपाध्यक्षपदी संजय वानखेडे, चिखली कामगार सेनेचे शहराध्यक्षपदी गोपाल जाधव, कामगार सेनेचे शहर उपाध्यक्षपदी शेख कलीम, महिला चिखली तालुका अध्यक्षपदी पदी अलका ताई जाधव, चिखली शहर अध्यक्षपदी शालिनीताई सोनटक्के, चिखली तालुका सचिव पदी सुरेश इंगळे, युवा शहराध्यक्षपदी शेख मालिक यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन चिखली शहर अध्यक्ष सुनील सोळंके ,चिखली तालुका अध्यक्ष अभिषेक खरात, युवा तालुका अध्यक्ष चिखली राहुल वानखेडे, युवा ता.उपाध्यक्ष शेख वसिम, यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव काकडे, पेंटर संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ इंगळे, यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात पंचकोशीतील कार्यकर्त्यांनी तसेच महिलांची लक्षणीय उपस्थिती होते. बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.