वैजापूर
समृद्धी महामार्गासाठी स्थानिक महसूल विभागाची अधिकृत संमती न घेता दगड,मुरुमासाठी अवैधरित्या मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी महसूल विभागाने ५७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ७२८ब्रास अवैधरित्या मुरूम उत्खनण केल्याचे झाले आहे.त्यामुळे कंपनीला तहसीलदार राहुल गायकवाड यांनी ५७लाख रु चा दंड कंपनीला ठोठावला आहे.
४ डिसेंबर रोजी तालुक्यातील दहेगाव येथील गायरान जमीम गट क्रमांक १६३ मधील गायरान जमिन खोदून विना परवाना पोकलॅन च्या साह्याने मुरूम उत्खनण सुरू होते . करंजगाव येथील गोकुळ सुराशे यांनी तक्रार केल्या नंतर तिन हायवा ट्रक, पोकलेन जप्त केले होते. या प्रकरणी एल अँड टी कंपनीला ७२८ब्रास अवैध उत्खनन केल्या प्रकरणी एल अँड टी कंपनीच्या तिन हायवा यांना प्रत्येकी २ लाख रुपये व पोकलॅनला ७ लाख पन्नास हजार असे एकूण १३लाख ५० हजार रुपये दंड व बाजार भावाच्या पाच पट दंड ४३ लाख ६८हजार रुपये दंड केला आहे.त्यामुळे एल अँड टी कंपनीला एकूण ५७ लाख रुपये चा दंड झाला आहे .
दरम्यान गोकुळ सुराशे यांनी येत्या काही दिवसात अवैधरित्या मुरूम उत्खनण करण्यास एल अँड टी कंपनीला मदत करणाऱ्या इतर अनेक विभागातील अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.
ReplyReply to allForward |