Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे वैजापुरात स्वागत



 वैजापूर भारती कदम

         वैजापूर बैलगाडी शर्यतीवर निर्बंध सर्वोच्च न्यायालय उठवल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष साजरी करण्यात आला.गेले कित्येक दिवसापासून बैलगाडी शर्यतीवर ती सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध लावले होते तरीपण काही ठिकाणी चोरून-लपून बैलगाडी शर्यत ही चालू होती त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती ते सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की बैलगाडा शर्यत या वरती निबंध हटवण्यात आली आहे त्या अनुषंगाने वैजापूर तालुक्यात बैलगाडी शर्यत प्रेमी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ फटाके फोडून जल्लोष साजरी केला.
        
        ह्या आनंद उत्सव मध्ये धीरज राजपूत अजय राजपूत योगेश त्रिभुवन पवन त्रिभुवन धरम राजपूत युसुफ बाबा. कैलास बावचे. संजय डहाके, हिरे बाबा  राजपूत. अतुल,पानगव्हाणे. नितीन खंडागळे. आबा वडग्गे. बाळू खंडागळे.यांची उपस्थिती होती. गेल्या कित्येक दिवसापासून बैलगाडी शर्यती वरती निर्बंध लावले होते ते निर्बंध आज सर्वोच्च न्यायालयाने उठवले त्या अनुषंगाने वैजापूर तालुक्यातील बैलगाडी शर्यती यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

खुप दिवसानंतर न्याय मिळाला.. पवन त्रिभुवन. गेले कित्येक दिवसापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय पेंडिंग पडलेला होता परंतु आमचा विश्वास होता न्यायालय वरती आणि न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला आम्ही सर्व बैलगाडी शर्यतीचे मालक असून बैलगाडी शर्यत चालवणे ही आमचा शोक असून त्या अनुषंगाने  आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे त्यामुळे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. आम्ही बैलांना काहीही त्रास न देता शर्यत जिंकू असा विश्वास पवन त्रिभुवन यांनी व्यक्त केला.