वैजापूर भारती कदम
वैजापूर -तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या सहा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी बुधवारी करण्यात आली.मंगळवारी या जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. म्हस्की / सिद्धापुरवाडी ग्रामपंचायत मध्ये शेख जायदाबी रसूल या ३४६ मते घेऊन विजयी झाल्या.त्यांचा प्रतीस्पर्धी उमेदवार शेख रियाज अजीज यांना १८३ मते मिळाली.संजरपुरवाडी ग्रामपंचायत च्या पोटनिवडणुकीत रुखमनबाई विठ्ठल जारवाल या २९६ मते घेऊन विजयी झाल्या.तर कारभारी फुलसिंग बढिया (१४२ मते) यांचा पराभव झाला.
तर महालगाव च्या दोन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली.यात संपत पंडीतराव जाधव हे ३३४ मते घेऊन विजयी झाले.तर त्यांचे विरोधी उमेदवार मंगेश मधुकर गायकवाड (२८७ मते) यांचा पराभव झाला.दुसऱ्या जागेवर गणेश संजय शेवाळे (३६३ मते) विजयी झाले.त्यांनी रामेश्वर गोरखनाथ पाटोळे (२५८ मते)यांचा पराभव केला.तलवाडा ग्रामपंचायत निवडणुकीत शेख असीफ बाबू (२३८ मते) विजयी झाले.त्यांनी शेख मुनीर चाॅंद (२०६ मते) यांचा पराभव केला.तर डाग पिंपळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत ज्योती संतोष मोरे (१३२ मते) या विजयी झाल्या.त्यांनी अल्का राजेंद्र मोरे (८७ मते) यांचा पराभव केला.