वैजापूर भारती कदम
वैजापूर - तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सहा जागांसाठी १२ जण निवडणूक रिंगणात उतरले असून २१ डिसेंबर रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे.तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या २८ जागांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.त्यानुसार ३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.त्यातील महालगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील दोन जणांचे अर्ज अवैध ठरले.तर १२ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.त्यामुळे आठ जण बिनविरोध निवडून आले आहेत.
तर १५ जागा परत एकदा रिक्तच राहिल्या आहेत.तर म्हस्की, डागपिंपळगाव,तलवाडा, संजरपूरवाडी ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी व महालगाव ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी अशा एकूण पाच ग्रामपंचायतीच्या सहा जागांसाठी १२ जण निवडणूक रिंगणात उतरले आहेत.तर भादली -विमलबाई सुदाम सोनवणे,रोटेगाव -निहाबाई नामदेव थोरात,कोल्ही-हिराबाई साहेबराव गोंधळे,बाबतारा-दत्तात्रय भाऊसाहेब गायकवाड, मालेगाव-सतीश दत्तात्रय औताडे,जरुळ -गिताबाई वाल्मीक मतसागर, खिर्डी-वर्षा ज्ञानेश्वर तांबे व वैजापूर ग्रामीण दोन मधून ताराबाई गणपत गलांडे हे आठ जण बिनविरोध निवडून आले आहेत.तर भादली, वैजापूर ग्रामीण दोन,पारळा,बेलगाव, हनुमंतगाव ,तिडी,वांजरगाव,हिंगणे कन्नड,नादी,खिर्डी व नांदूरढोक येथील जागा अर्ज न आल्याने परत एकदा रिक्तच राहिल्या आहेत.२२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे