Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तलवारीने केक कापला, गुन्हा दाखल



 वैजापूर भारती कदम

         वैजापुर वाढदिवसानिमित्त सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापुन जल्लोष केल्याबद्दल पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची धो कारवाई केली. हा प्रकार शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास शनि मंदिरासमोर टिळक रस्त्यावर घडला. वाढदिवस साजरा करण्यासाठी हे तरुण रात्री अकरा वाजेच्या सुमारास शनि मंदिराजवळ एकत्र आले. पण वाढदिवसाचा केक कापण्यासाठी त्यांनी चक्क तलवारीचा वापर केला. 

    तलवारीने केक कापून त्यांनी वाढदिवसाचा जल्लोष केला. करोनाच्या पार्श्वभुमीवर एकत्र येऊन त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. तसेच धारदार शस्त्र जवळ बाळगुन भारतीय हत्यार कायदा व आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांच्या विविध कलमांचे उल्लंघन करुन अपराध केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांतर्फे नाईक योगेश झाल्टे यांनी फिर्याद दिल्यानंतर अर्जुन उचित, गोकुळ उचित, श्रावण चौधरी, सोनु राजपूत, प्रणव खैरनार यांच्यासह इतरांवर वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रमेश जाधवर तपास करीत आहेत.