वैजापूर- शहरातील तहसिल कार्यालयाच्या बाजुला असलेले तलाठी कार्यालय मागील पाच महिन्यांपासून सतत बंद आहे.परिणामी तलाठी कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांची व शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे.वैजापूर तलाठी कार्यालय अंतर्गत वैजापूर शहरासह परिसरातील वाड्या वस्त्यांचा समावेश होतो.या कार्यालयात मोठ्या प्रमाणात नागरिक व शेतकऱ्यांची सातबारे व अन्य प्रमाणपत्र घेण्यासाठी गर्दी असते.मात्र हे कार्यालय पाच महिन्यांपासून सतत बंदच असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे
.या सर्वांमुळे वेळ ,पैसा वाया जात असून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.आपल्या विवीध कामांसाठी दुरवरून पायपीट करून येणाऱ्या ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी म्हणून ओळख जाणारा तलाठी गायब असल्याने नागरीक यावर तीव्र संताप व्यक्त करत आहे.