मुंबई आग्रा महामार्गावर कांदा लसूण संशोधन केंद्राजवळ भरधाव असलेल्या टाटा मांजा कार MH 19 BJ 1155 ने रस्त्याच्या कडेला असलेल्या फळं विक्रेते यांना जबर धडक दिली.
या अपघातात मुखेड देवगाव येथील रहिवासी शब्बीर शहा (वय ६०) गंभीर जखमी झाले . यांना प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव बसवंत येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू होवून शव विच्छेदनासाठी शव जिल्हा रूग्णालय नाशिक येथे पाठविण्यात आले आहे. कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून वृत्त लिहे पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.