Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

२६ जणांविरुध्द वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल



 वैजापूर

       तालुक्यातील पालखेड येथे पारेश्वर यात्रेनिमित्त  घोडा गाडी व बैल गाडीची शर्यत लावणारे चालक ,मालक व यात्रा कमीटीचे सदस्य  अशा  एकूण २६ जणांविरुध्द  वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ही घटना रविवारी दुपारी घडली.  पोलीसांनी ३१ लाख ५० हजारांचा मुद्देमाल  जप्त केला आहे. पालखेड येथे पारेश्वर यात्रा महोत्सव सुरू आहे. यात्रेच्या आयोजकांनी या यात्रेनिमित्त महाराष्ट्रात बंदी असलेल्या बैल गाडी व घोडा गाडीची शर्यत रविवारी आयोजित केली होती.याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सम्राट राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत यांच्या पथकाने तेथे भेट दिली.त्यावेळी तेथील हाडोळ जमीनीत शर्यतीची तयारी सुरू होती.

     या प्रकरणी सहाय्यक फौजदार विजय खोकड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यात्रा कमिटी सदस्य नारायण औटे, सुरेश कान्हे, विजय धनाड, नितीन कान्हे, बंडू भाडाईत, कृष्णा भडाईत, सोमा जाधव, विजय शेळके, प्रदीप शेळके, गंगाधर शेलार, लक्ष्मण जाधव सर्व रा.पालखेड तसेच घोडा गाडी व बैलगाडीचे चालक व मालक यशवंत शिंदे, मधुकर वैद्य दोघे रा.सवंदगाव, समीर कुरेशी, किशोर गायकवाड दोघे रा.गंगापूर, अक्षय जाधव, रामकीसन वाढेकर दोघे रा. चिंचडगाव, अशोक मगर रा.कोल्ही, कांताराम फाळके रा. हनुमंतगाव, पोपट जाधव रा.सटाणा, गोरखनाथ गाढे रा.मुद्देशवाडगाव, अमोल जानराव रा.वरखेड, सुनील निकम, चेतन साळुंके दोघे रा.रायपूर, दीपक खंडागळे रा.माळीसागज व सागर आगळे रा. गोगलगाव ता.नेवासा या २६ जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलीसांनी शर्यतीत आणलेले पशुधन, घोडे, बैल गाड्या, चार चाकी वाहने असा एकूण ३१ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.