Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अदालतीत ११ प्रकरणे निकाली



 भारती कदम


         वैजापूर   येथील  न्यायालयात  लोकअदालत चे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीत ११ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये विज मंडळ उपविभागाअंतर्गत दोन  वर्षांपासून प्रलंबित असलेली विज चोरीचे प्रकरण होते. शेख नसीम शेख लाल तांबोळी यांचे प्रकरण हे प्रकरण विज कंपनीचे कार्यकारी अभियंता दौड  (कन्नड) व उपव्यवस्थापक  दिवेकर  (कन्नड ) यांच्या मार्गदर्शनाखाली निकाली काढण्यात आले.  

        वैजापूर विभागाचे उपकार्यकारी अभियंता बडवे यांनी यासाठी प्रयत्न केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश मुळे यांच्या   न्यायालयात दिवानी दावा निकाली  काढण्यात आला .तसेच इतर 10 प्रकरण  असेसमेंट रू.३९७३३व तडजोड रक्कम १८००० असे एकूण रु. ५७७३३ भरणा करून  निकाली काढले. त्यात न्यायालयाचे कर्मचारी व उपविभागाचे सहाय्यक लेखापाल  सतीश राठोड , संदीप गारजकर,  प्रवीण खांडरे यांची उपस्थिती होती.