मलकापूर दि.१३ डिसेंबर
महाराष्ट्र राज्य बॉलबॅडमिंटन असोसिएशन अंतर्गत बॉलबॅडमिंटन स्पोर्टस असोसिएशन बुलढाणा व स्पोर्टस झोन ऑफ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. वसंत सावजी व स्व.डॉ सुरेश बोगाडे मेमोरियल ६६ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय ज्युनियर बॉलबॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन होणार असल्याची माहिती बॉलबॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव विजय व तसेच बुलढाणा जिल्हाला पळसकर यांनी दिली. आजयागत चौथ्यादा राज्य स्पधेचे आयोजन करण्याची जबाबदारी मलकापूर शहराला राज्य संघटनेतर्फे देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
१९८० च्या दशकात स्व वसंत सावजी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर
खेळाचे प्रशिक्षण सुरू झाले होते. त्यामुळेच १९९० ते २०११ पर्यंत बुलढाणा
जिल्ह्यातील खेळाडूंचे या खेळावर महाराष्ट्रात एकतर्फी वर्चस्व होते. या खेळाच्या
माध्यमातून बऱ्याच खेळाडूंची शासकीय सेवेत संधी मिळाली आहे. तसेच या खेळाच्या
माध्यमातून राष्ट्रीय खेळाडू राहिलेले निलेश महाजन यांची महाराष्ट्र राज्य
संघटणेच्या अस्थाई समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे .
१९
वर्षाखालील मुले व मुली गटाच्या या स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल मलकापूर
येथे करण्यात आले असून या स्पर्धेत महाराष्ट्रातील ४० ते ४५ संघ सहभागी होणार
असल्याची माहिती बॉलबॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष निलेश महाजन यांनी दिली
सदर स्पर्धेसाठी बॉल बॅडमिंटन स्पोर्टस असोसिएशन बुलढाणा व गौरीशंकर व्यायाम
शाळेच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना व तांत्रिक समिती सदस्य जिल्हा संघटनेच्या
सचिवांना विशिष्ट प्रकारच्या सुविधा देण्यात येणार असल्याचे कळविले आहे.
या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार असून हा संघ
पुढील महिन्यात मोतीहरी, बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत
महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारा असा आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी
विविध समिती गठीत केल्या असून निलेश महाजन, राजेश्वर खंगार, विजय पळसकर,
अतुल जगदाळे, गजानन जोगदंड, ईश्वर बोबडे, विलास पालवे, नितीन भुजबळ , कैलास पवार,
संमती जैन, जितेंद्र मराठे ,संदीप जगदाळे तसेच सर्व शाळेचे क्रीडा शिक्षक यांच्या
सहकार्याने स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात येणार आहे.