वैजापूर
दरवर्षी कन्नड तालुक्यातील श्री क्षेत्र शिवेश्वर संस्थान वाकी देवाची येथील शिवस्वरूप नारायण बाबा यांची दिंडी आळंदी ला जाते ,हे त्यांचे विसावे वर्ष आहे या निमित्ताने शिवेश्वर भक्त बापूसाहेब गावडे यांनी वैजापूर येथे या भक्त भाविकांचा फराळ पाणी देऊन सन्मान केला .या प्रसंगी आपल्या अमृत वाणीतून हं,भ,प, काटकर महाराज यांनी संबोधित केले.या प्रसंगी धोंडीरामसिंह राजपूत, सोन्याबापू गावडे,रवींद्र गावडे यांनी हभप काटकर महाराजांचे पूजन केले.यावेळी साहेबराव नांगरे ,भाऊसाहेब जगताप,उल्हास साळुंके,बाबुराव गावडे, शिवाजी गावडे,सुधाकर साळुंके,रामकीसन जोरे , सोपान निकम,घनश्याम वाणी,दगु वाणी आदींची उपस्थिती होती.