प्रतिनिधी/ महेश साळुंके
निफाड :जागतिक दिव्यांग दिन ३ डिसेंबर हा १९९२ पासून जगभरात साजरा केला जातो त्याच पार्श्वभूमीवर प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने निफाड पंचायत समिती कार्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. त्यावेळेस गट विकास अधिकारी सानप यांनी शासनांच्या जीर समजून सांगितले व दिव्यांग बांधवांची संवाद साधत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या योजना सांगितल्या व उपस्थित दिव्यांग बांधवांचे प्रश्नांचे निवारण केले.तसेच संजय गांधी कार्यालायचे नायब तहसीलदार श्री भावसार यांनी संजय गांधी योजना व शासकीय योजना संदर्भातील दिव्यांग व्यक्तिंना मिळणाऱ्या योजना समजून संगील्या तसेच व प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने निफाड शासकीय रुग्णालयात रुग्णांना चहा, बिस्कीट देण्यात आले त्यावेळेस प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ धुमाळ, प्रहार युवा आघाडीचे जयेश जगताप, प्रहार दिव्यांग संघटनेचे ता.उपाध्यक्ष बापूराव राउत, अशोक चव्हाण, ज्ञानेश्वर आढाव, विलास भालेराव, माधव वाघ,संदीप क्षीरसागर, विलास बोरस्ते,इम्रान पठाण, आकाश, धुमाळ, ज्ञानेश्वर पठारे,रोषण तिडके,विजय गरुड प्रहारचे संघटनेचे कार्यकर्ते व पदधिकारी उपस्थित होते,
प्रतिक्रिया
आजच्या दिव्यांग दिन हा जगभरात साजरा केला जातो पण ग्रामीण भागातील दिव्यंग हा योजनांपासून अजून पण वंचित आहे. शासकीय योजना या गावा गावातील दिव्यांग पर्यंत कश्या प्रकारे पोहचतील याचे काम ग्रामसेवक व सर्व शासकीय अधिकारी यांनी केल्यास मला वाटत दिव्यांग खरा दिव्यांग हा योजनेपासून वंचित राहणार नाही.
सोमनाथ धुमाळ प्रहार दिव्यांग संघटना ता.अध्यक्ष