Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न




 वैजापूर


आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रिडा शिक्षक संघ व वर्डलॅन्ड पब्लिसिग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील श्रमिक पत्रकार भवन सभागृहात  मनामनातील बाबाजी या वैजापूर येथील ग्रामीण साहित्यिक बाबा चन्ने यांच्यावर लिहिल्या गेलेल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक तथा ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हस्ते संपन्न झाले. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक, माजी सनदी अधिकारी व ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष  लक्ष्मीकांत देशमुख होते. तसेच प्रमुख पाहूणे म्हणून पुणे शहरातील प्रसिद्ध विधिज्ञ तथा विचारवंत ॲड एन. डी. पाटील , ॲड. संतोष म्हस्के होते.

या काव्यसंग्रहाचे संपादन अमर भुंगूर्डे यांनी केले असून सहसंपादन कावेरी गायके यांनी केले आहे. तसेच प्रसिद्ध चित्रकार शशांक पाटील यांनी काव्यसंग्रहाचे अप्रतिम मुखपृष्ठ रेखाटले आहे.  विश्वभान प्रतिष्ठानचे अध्यक्ष व एफेम रेडिओ पुणेरी आवाजाचे आर.जे. प्रा. जगदीश संसारे यांनी प्रास्तवना लिहिली आहे . तसेच मलपृष्ठाच्या रूपाने जयश्री औताडे यांनी एका पानात बाबा चन्ने यांचे चरित्र मांडले. तसेच प्रसिध्द सिनेअभिनेत्री तथा आकाशवाणी धुळे केंद्राच्या निवेदिका पूनम बेडसे यांनी काव्यसंग्रहाचे तांत्रिक कामे पार पाडली आहे.  विंदा वीरकर, स्नेहल जगताप, हरी दळवी, संजिवनी इंगळे यांचे  सहकार्य पुस्तकासाठी लाभलेले आहे. 


या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रिडा शिक्षक संघ व संविधान लोकउत्सव समिती या संस्थेचे अध्यक्ष प्रा. संदिप चोपडे, सचिव प्रा. दिपक दळवी  यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संदीप चोपडे यांनी व सुत्रसंचालन गजानन उफाडे यांनी केले.

तसेच कार्यक्रमासाठी  डाॅ. प्रविण पंडीत,दत्ता चव्हाण, संतोष केंगले, प्रा.संजय देवरे, प्रा.विलास जाधव, सुधाकर भोपळे, संतोष मोरे, प्रा. वैशाली पानसरे, मंगल चोपडे,  अश्विनी जोशी, प्रा. राजेंद्र चौधरी, प्रा.शुभांगी बोबडे,  राजेश आगवणे, सतीष पराळे,  पेंठारकर ,  दिपक कापरे, नवनाथ चन्ने आदींची उपस्थिती होती. आभार प्रदर्शन कवयित्री प्रिती भालेराव यांनी केले.