वैजापूर- विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित भागीरथी माध्यमिक विद्यालय नालेगाव येथे महपरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालायाचे प्राचार्य श्री बी. एम. हजारे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय सुरासे हे होते.याप्रसंगी प्रमोद पठारे,भरत निंबाळकर, रोहिदास त्रिभुवन, सूरज साळवे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बी. एम. हजारे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक व सामाजिक विचार मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती जानराव व सोनाली कुमावत यांनी केले तर आभार पूजा काकडे हिने मानले.
या प्रसंगी प्रमोद चव्हाण,राजेश्वर विभुते, गणेश जगताप, प्रविण जाधव , प्रमोद रिंढे, त्र्यंबक गावडे,श्रीमती मनीषा उभेदळ, सागर राजपूत,भारत भोपळे, गंगाधर कटारे,श्रीमती जयश्री बोर्डे,गोकुळ पवार, यासह शिक्षकेतर कर्मचारी समाधान सुरासे,सुनील बोडखे, किशोर साळूंके, ज्ञानदेव तायडे, विशाल साबळे,उत्तम सरोवर उपस्थित होते.