वैजापूर-
जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेतर्फे विभागीय क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या चाचणीत तालुक्यातील नालेगाव येथील भागीरथी विद्यालयाच्या दोन खेळाडुंनी चमकदार केली.त्यायध्ये वैष्णवी सोनवणे हिने ७१ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला.तिची राज्यस्तरीय वेटलिफ्टींग क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. युथ कनिष्ठ व वरिष्ठ जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या निवड चाचणी चे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. भागीरथी विद्यालयाच्या वैष्णवी सोनवणे व सायली कुमावत या दोन खेळाडूंनी निवड चाचणीत सहभाग नोंदवून चमकदार कामगिरी केली. त्यामध्ये वैष्णवी सोनवणेची 71 किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल तिची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा.चंद्रकांत गायकवाड, सचिव वाल्मीक सुरासे, वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष राजू वैद्य, सचिव दीपक रुईकर, अकबर खान, प्राचार्य बी. एम. हजारे, प्रमोद पठारे, क्रीडा शिक्षक भरत निंबाळकर, क्रीडा मार्गदर्शक भाऊसाहेब खरात, सुनील भवर, प्रमोद चव्हाण, राजेश्वर विभूते, प्रविण पी जाधव, गणेश जगताप, प्रमोद रिंढे, त्र्यंबक गावडे, मनीषा उभेदळ, सागर राजपूत, रोहिदास त्रिभुवन, प्रविण एस जाधव, भारत भोपळे,निर्मला शिरसाठ, गंगाधर कटारे, गोकुळ पवार, जयश्री बोर्डे, योगेश शिंदे, सुरज साळवे, मंजुषा सुरासे व शिक्षकेतर कर्मचारी सुनील सपकाळ , समाधान सुरासे, सुनील बोडखे, किशोर साळुंके, ज्ञानदेव तायडे,अमोल त्रिभुवन, उत्तम सरोवर,विशाल साबळे, भगवान सुरासे, आदींनी हार्दिक अभिनंदन केले