वैजापूर प्रतिनिधि:-भारती कदम
वैजापूर-शहरातील रेणूका नगर येथून चोरट्यांनी एक मोटार सायकल लंपास केली.विजय लक्ष्मण निकम यांनी आपली मोटार सायकल (एम एच २० एक एन ७९४६) घरासमोर लाॅक करून उभी केली होती.मात्र चोरट्यांनी ती लंपास केली.या मोटारसायकल ची किंमत २० हजार रुपये इतकी आहे.या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.