वैजापूर-
प्रेम विवाहाच्या कारणावरून आई व भावाने ठार केलेल्या विवाहीत युवतीवर पोलीस बंदोबस्तात सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.प्रेम विवाह केल्याच्या कारणावरून रविवारी दुपारी किशोरी उर्फ किर्ती या विवाहीत युवतीवर कोयत्याने वार करून आई व भावाने ठार केले होते.किशोरी हिचे मुंडके धडावेगळे करून ते तो हातात घेऊन सख्खा भाऊ घराजवळ फिरला होता.याशिवाय बहीणीचे मुंडके हातात घेऊन त्याचे सेल्फी काढत त्याने निचतेची सिमा ओलांडली होती.बहीण दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे माहीत असून देखील बहिणी सोबतच जन्माला येणाऱ्या भाचाचा देखील त्याने बळी घेतला होता.
.या कटात त्याची आई देखील सामील झाली होती.किशोरी हिने घरातून पळून जाऊन शेजारी राहणाऱ्या अविनाश थोरे या युवकाशी प्रेमविवाह केला होता.या प्रकरणी तिचे वडील संजय यमाजी मोटे यांनी किशोरी बेपत्ता झाल्याची नोंद वैजापूर पोलीस ठाण्यात केली होती.त्यानंतर पोलीसांनी तपास केला असता किशोरी हिने आळंदी येथे जाऊन गावातीलच रहिवासी असलेल्या अविनाश थोरे या युवकाशी प्रेमविवाह केला होता.पोलीसांनी दोघांनीही वैजापूर पोलीस ठाण्यात आणून आईवडीलांशी जुन २०२१ महीन्यात भेट घडवून दिली होती.किशोरी हिचे वडील संजय व आई शोभा यांनी तिला घरी येण्याची विनवणी केली होती.तसेच पोलीस अधिकारी यांच्या समक्ष आई वडीलांनी तिचे पाय धरून असे करू नको अशी गयावया केली होती.किशोरी हि आई वडिलांची लाडकी होती.तिला महाविद्यालयात जाण्यासाठी आई वडीलांनी बुलेट घेऊन दिली होती.
संजय मोटे हे गावातील प्रतीष्ठीत बागायतदार मानले जातात.धुमधडाक्यात किशोरी चे एखाद्या मोठ्या घरात लग्न लावून देण्याचा त्यांचा इरादा होता.मात्र घडले भलतेच किशोरी ने आई वडिलांना विश्वासात न घेता प्रेम विवाह केला होता.आई वडीलांनी गयावया करून सुद्धा ती आपल्या निर्णयावर ठाम होती.त्यातच गोयगाव गावात थोरे विरूद्ध मोटे असा जुना वाद आहे.नेमके विरोधी थोरे गटातील युवकाशी किशोरी ने लग्न करणे आई वडीलांना आवडले नाही.त्यातुनच तिचा काटा काढायचा आई व भावाने निर्णय घेतला.त्यामुळे तिच्याशी आई व भावाने जवळीक केली.चार दिवसांपुर्वी आई व लेक मुलीच्या घरून पुर पोळीचे जेवण करून आले होते.या जवळकीमूळे तिचा घात झाला.आई व भाऊ रविवारी घरी आल्यामुळे तिला याचा किंचीत ही संशय आला नाही.ती सासू सासऱ्यासोबत शेतात काम करीत असताना आई व भाऊ आल्याने घरी आली.ती त्यांच्यासाठी चहा करीत असताना त्यांनी निर्दयीपणे तिचा खून केला.तसेच तिचे मुंडके धडावेगळे करून त्याच्यासोबत सेल्फी देखील काढले.या घटनेमुळे समाज मन सुन्न झाले आहे.किशोरी हिचा पती अविनाश याच्यावर देखील काही गुन्हे दाखल आहेत.तो गुन्हेगारी प्रवृत्ती चा असून त्याने फसवून व आमीष दाखवून किशोरी हिच्यासोबत विवाह केल्याचे काही गावकऱ्यांचे म्हणणे आहे.पोलीसांनी आरोपींना अटक केली आहे.त्यांना वैजापूर येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश एस एस निचळ यांनी मुलीची आई शोभा हिस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.तर तिचा भाऊ हा तपासात अल्पवयीन निघाल्याने बाल न्यायमंडळासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहे.मयत किशोरी हिच्यावर सासरी अंत्यसंस्कार करण्यात आले.पती अविनाश याने मृतदेहास अग्नीदाह दिला आहे.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे , फौजदार नवनाथ कदम व कर्मचारी उपस्थित होते.मोटे व थोरे कुटुंबातील अन्य सदस्य हजर न राहील्याने केवळ २० ते २५ लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.