वैजापूर-भारती कदम
तालुक्यातील वैजापूर श्रीरामपूर व तलवाडा ते परसोडा या राज्य रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्गात करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस डॉ दिनेश परदेशी यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री यांच्या कडे केली आहे.वैजापूर श्रीरामपूर हा रस्ता मराठवाडा ते पश्चीम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे.या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.कांदा,ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर हा रस्ता सोयीस्कर आहे.येथील ऊस व कांदा या मार्गाने पश्चिम महाराष्ट्रात विक्री साठी जातो.परंतू या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्ती साठी काही दिवसांपासून निधी खर्च न केल्याने हा रस्ता खराब झाला आहे.त्यामुळे अपघात होऊन शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होते आहे.
तसेच वाहनांचे ही नुकसान होते.त्यामुळे या राज्य रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्गात करावा.त्यामुळे नविन नियम व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊन दर्जेदार रस्ता मिळेल.त्यामुळे नागरीकांची सोय होईल.याशिवाय तलवाडा- जानेफळ-खंडाळा-परसोडा या रस्त्याचा देखील राष्ट्रीय महामार्गात समावेश करावा.अशी मागणी परदेशी यांनी केली.दिल्ली येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली.