Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वीस ग्राहकांनी मीटर मध्ये हेराफेरी करुन ३८ हजार ७९७ युनिटची वीज चोरी केल्याचे उघडकीस

 वैजापूर 

विद्युत महावितरण कंपनीच्या  भरारी पथकाने शहरात बुधवारी मीटर तपासणी केली. या तपासणीत  वीस ग्राहकांनी मीटर मध्ये  हेराफेरी करुन ३८ हजार ७९७ युनिटची वीज चोरी केल्याचे  उघडकीस आले.

या कारवाईत डॉक्टर, बांधकाम क्षेत्रातील कंत्राटदार असे प्रतिष्ठीत मंडळीचा समावेश असल्याने विज चोर ग्राहकांत खळबळ उडाली आहे.  महावितरण कंपनीच्या पथकाने या विज चोर ग्राहकांकडून ७ लाख ९३ हजार ५६९ दंड वसूल केला आहे .वैजापूर शहरात  वीज गळतीचे प्रमाण वाढल्यामुळे  महावितरण कंपनीला आर्थिक तोटा सहन करावा लागत होता.त्यामुळे महावितरण कंपनीतील अधिका-यांनी वैजापूर शहरातील वीज गळती शोधण्यासाठी मुंबई येथील विशेष भरारी पथकाची वीज चोरी रोखण्यासाठी नेमणूक केली होती .स्थानिक महावितरण कंपनीतील अधिकारी व कर्मचा-यांना  घेऊन पथकाने शहर परिसरातील घरगुती ग्राहकांचे विद्युत मीटर  आधुनिक यंत्राद्वारे तपासले. या तपासणीत  २० ग्राहकांनी त्यांच्या घरगुती   मीटर मध्ये  हेरफेरी करुन ३८ हजार ७९७ युनिटची वीज चोरी केल्याचे उघडकीस झाले. पथकाने विज चोरी करणा-या ग्राहकांना ७ लाख ९३ हजार ५६९रुपये दंडाच्या नोटीसा बजावली.त्यांनी  दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर भारतीय विद्युत कायदा कलम १३५ नुसार गुन्हा  महावितरण कंपनीच्या विशेष पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे विज चोर ग्राहकांनी  महावितरण कंपनीच्या तिजोरीत तडजोड करून दंडात्मक रक्कम   जमा केली. 

विज चोर ग्राहक, त्यांनी केलेल्या युनिटची चोरी व आकारलेल्या दंड पुढील प्रमाणे

१) दिपाली गणेश अग्रवाल - युनिट ३ हजार ५४५ दंड ७८ हजार ६६०

२) सुभाष रामचंद्र आल्हाट - युनिट १ हजार ५७३ दंड १८ हजार ८९० 

३) बाळनाथ रंगनाथ बनकर -युनिट २ हजार ६६४ दंड ५३ हजार ५९०

४) चंद्रपाल भरतसिंग राजपूत -युनिट ५ हजार ८८६ दंड १ लाख १२ हजार ८९०

५) राम बद्रीनारायण उचित - युनिट ८१४ दंड १७ हजार ७५० 

६) मुकीम अहेमद शेख - युनिट १ हजार ९७६ दंड ३६ हजार ७५० 

७) राजेंद्र फकिरा मतसागर युनिट १ हजार ९८० दंड ४० हजार ७२१

८) उमेश शंकर जगताप युनिट - ८७१ दंड १५ हजार ७२०

९) लक्ष्मीबाई अरुण शिंदे युनिट ९७९ दंड १६ हजार 

१०) रमेश काशिनाथ निखाडे युनिट १ हजार ९६७ दंड ४१ हजार ४७८

११) दातरे काशिनाथ निखाडे युनिट -१ हजार ५५१ दंड ३४ हजार ६७० 

१२) मधुकर नारायण वाघचौर युनिट ४३३ दंड ११ हजार 

१३) दादासाहेब बन्सी फोपसे युनिट २ हजार ४३१ दंड ५६ हजार 

१४) संदिप तुलसीदास निर्मळ युनिट ३ हजार २३८ दंड ८२ हजार १७० 

१५) अनिल वसंतराव सहाने  युनिट ५१६ दंड ११ हजार ८००

१६) दिपकसिंग देवलसिंग राजपूत युनिट ३ हजार ६५४ दंड ८३ हजार ८८० 

१७) बाबासाहेब काशिनाथ ठुपके युनिट १ हजार १७६ दंड  १९ हजार ७००

१८) सुनील वसंतराव सहाने युनिट ४८० दंड १० हजार ६९०

१९) दिपाली भाऊसाहेब भिंगारदिवे युनिट ७६६ दंड दहा हजार ६४० 

२०) मनोज शिरलालसिंग चावण २ हजार २९७ दंड ४०हजार ७२०