वैजापूर, शहर व ग्रामीण भागात बुधवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. मागील दोन दिवसांपासुन थंडीचे प्रमाण वाढले असुन नागरिक थंडीचा अनुभव करत आहेत. बुधवारी वैजापूर शहराचे किमान तापमान १५ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २१ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. किमान तापमानात घट झाल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला होता. दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. ग्रामीण भागात बहुतेक ठिकाणी पाऊस पडल्याचे वृत्त आहे.