वैजापूर
भाजपाच्या कार्यकाळात महागाईच्या भस्मासुराने तोंड वर काढले असुन सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. कॉंग्रेस सरकारच्या काळात आतापेक्षा कच्च्या तेलाचे भाव जास्त असतांनाही इंधनाचे भाव कमी होते. मग आताच पेट्रोल, डिझेल एव्हढे महाग का? घरगुती गॅसचे दर ९५० रुपये झाले असुन अन्नधान्याची परिस्थितीही वेगळी नाही. अशा आशयाची पत्रके वाटुन तालुका कॉंग्रेस समितीतर्फे लासुरगाव, हडसपिंपळगाव व महालगाव येथे बुधवारी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. तालुका कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष प्रशांत सदाफळ, जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष पंकज ठोंबरे, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सत्यजित सोमवंशी, भाऊसाहेब झिंझुर्डे यांनी नागरिकांना पत्रके दिली. यावेळी दिगंबर वाघचौरे, रजनीकांत नजन, गणेश पवार, कैलास पवार, नंदू निकम, तुषार रासने, सोमनाथ म्हैसमाळे, शौकत शेख, दिपक हरिचन्द्रे, जगदीश झिंजुर्डे, बंटी हरिचन्द्रे, ऋषिकेश हुमे, सचिन डावरे, भगवान गाजरे, ज्ञानेश्वर निघोटे, कारभारी निघोटे, किरण वंजारे, इरफान बागवान, शाहरुख पठाण, अप्पासाहेब निघोटे, निवृत्ती गाजरे, बाळू सोनवणे व कार्यकर्ते उपस्थित होते.