चिखली.
चिखली शहरातील गौरक्षणवाडी मधील नुरानी चौक येथे कोविड-१९ महामारीवर एकमेव पर्याय म्हणून को-वैक्सिन व कोविड शिल्ड लसीकरण चिखली मतदार संघाचे मा. विद्यमान आमदार सौ श्वेता ताई महाले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कोविडवर मात करण्यासाठी सध्या संपूर्ण लसीकरण हा एकमेव पर्याय आपल्यापुढे आहे. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घरोघरी लसीकरण मोहीम राबवण्याचे आवाहन केले असून त्यानुसार चिखली शहरातील प्रभाग क्रमांक १३ अ मध्ये श्री. समीर शेख यांच्या वतीने नुकतेच भव्य कोरोना लसीकरण शिबिर संपन्न झाले. या शिबिराला भेट देऊन जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना लसीकरणाचे आवाहन केले. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत गौरक्षणवाडी मधील शेकडो नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
या लसीकरण मोहिमेला विद्यमान आमदार सौ श्वेता ताई महाले यांनी स्वतः हजर राहून नागरिकांना लसीकरण साठी प्रोत्साहित केले, सदर लसीकरण शिबिराला शहरातील प्रतिष्ठित नागरीक, नगरसेवक तथा भाजपाचे शहर अध्यक्ष श्री. पंडितराव देशमुख, श्री. संजय आतार, श्री. सुभाष अप्पा झगडे (नगर सेवक), श्री. सागर पुरोहित भाजपा युवा मोर्चा शहरअध्यक्ष, यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य विभागाचे डॉ अनिल मोरे, रंजना मुळे (आरोग्य सेविका), शितल जाधव (मुख्य आरोग्य सेविका) दुर्गा बोचरे आरोग्य सेविका, प्रतीक जाधव राजु उंडे वाहन चालक यांच्या चमूने परिश्रम घेत लसीकरण शिबीर संपन्न करण्यात आले या वेळी लसीकरण शिबीराचे आयोजक समीर शेख यांचे मित्रमंडळ मोहम्मद युसुफ, सय्यद शहेजाद, शेख शमशेर, रेहान रजा, फराज शेख, इरफान शेख, मोहम्मद मोसीन, साहिल शेख, शाहरुख सय्यद, निसार, अरबाज, अकबर, सलमान, अय्युब, तौफिक, बबलू, कैफ, फय्यू आदी युवा कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.