प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर-बेकायदेशीर रित्या दारू विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या दोन जणांविरुद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.शहरात बेकायदा दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्या आधारे पोलिसांनी शहरात कारवाई केली.दिपक रंगनाथ मोरे रा.शास्त्रीनगर वैजापूर व स्वप्नील दत्तात्रय काळे या.राहता असे आरोपीचे नाव आहे.काळे हा मोटार सायकल वर चार हजार ५०० रुपयांची देशी विदेशी दारू घेऊन जात होता,.सदर दारु व १५ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली.तसेच मोरे याच्या ताब्यातून चार हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.दोन्ही आरोपी विरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.