,भारती कदम वैजापूर
निष्काम भावाने केलेली जनतेची सेवा व कर्तव्याचे निस्वार्थी पालन करणे ही खरी समाजसेवा होय. अशा निस्वार्थी भावाची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा असतेअसे अमृतवचन सरला बेटचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी केले. श्री क्षेत्र शिवूर येथील श्री शंकर स्वामी मंदिर संस्थांचे अध्यक्ष एकनाथ जाधव यांनी आयोजित "दिवाळी स्नेह भेट"या कार्यक्रमात वैजापूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महाराज पुढे म्हणाले की निष्काम भाव ठेऊन केलेली समाज सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा होय,आपल्या कर्तव्यात समर्पणाचा भाव असणेही गरजेचे आहे.एकनाथ जाधव दिवाळी स्नेह भेट हा कार्यक्रम दरवर्षी शिवूर येथे घेत असतात. परंतु कोरोना महामारीमुळे हा कार्यक्रम लांबला व तो वैजापूर ला घेण्यात आला.
विशेष म्हणजे जाधव यांनी आता सर्व व्याप सोडून नागरिकांच्या कामासाठी वैजापूरात राहून२४तास जनसेवा करण्याचा संकल्प केला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले . आभार जाधव यांनी मानले.या नंतर दिवाळी स्नेहभोजन झाले.यावेळी आमदार प्रा रमेश बोरणारे,नगराध्यक्ष शिल्पा परदेशी,उपनगराध्यक्ष साबेरखान, बाळासाहेब संचेती,प्रशांत सदाफळ,कल्याण दंगोडे,जि प सदस्य मधुकर वालतुरे, नारायण तुपे आदींची उपस्थिती होती