रक्तदानात लासलगाव भाजप मंडल अग्रस्थानी |
प्रतिनिधी/महेश साळुंके
लासलगाव-भारतीय संविधान दिन, महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी, तसेच मा मंत्री स्वर्गीय ए .टी पवार यांच्या जयंती निमित भारतीय जनता पार्टी लासलगाव मंडल आयोजित रक्तदान शिबिर लासलगाव येथे मार्केट कमिटी, कामगार भवन, भगरी बाबा मंदिराजवळ अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली असल्याची माहिती भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा तथा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सौ.सुवर्णा जगताप यांनी दिली आहे. लासलगाव भाजपा मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निफाडचे डी.वाय.एस.पी सोमनाथ तांबे , लासलगाव पोलिस ठाण्याची ए पी आय राहुल वाघ.निफाड,प्रतिनिधी-भारतीय संविधान दिन, महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी, तसेच मा मंत्री स्वर्गीय ए .टी .पवार यांच्या जयंती निमित भारतीय जनता पार्टी लासलगाव मंडल आयोजित रक्तदान शिबिर लासलगाव येथे मार्केट कमिटी, कामगार भवन,भगरी बाबा मंदिराजवळ अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली असल्याची माहिती भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा तथा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सौ सुवर्णा जगताप यांनी दिली आहे.
लासलगाव भाजपा मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निफाडचे डी.वाय.एस.पी सोमनाथ तांबे , लासलगाव पोलिस ठाण्याची ए पी आय राहुल वाघ कार्यक्रमास प्रमुख पाहुणे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य डि के नाना जगताप, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुवर्णाताईजगताप , नासिक मर्चट बँक व्हा.चेअरमन प्रकाश दायमा,ओबीसी हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास सोनवणे, सोपान काका दरेकर, कोटमगाव सरपंच मंडल उपाध्यक्ष रवींद्र होळकर, शहराध्यक्ष योगेश पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक राजेंद्र चाफेकर, कोषाध्यक्ष बापू लचके उत्तम शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी भाजपा मंडल पदाधिकारी, डी के नाना फ्रेंड सर्कल यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा मंडल अध्यक्ष स्मिता कुलकर्णीयांनी केले. आभार योगेश पाटील यांनी मानले यावेळी शहराध्यक्ष शैलजा भावसार ,जिल्हा चिटणीस ज्योती शिंदे, मंडल उपाध्यक्ष रूपा केदारे, जिल्हा सदस्य रंजना शिंदे सिंधुताई पल्लाळ, मंडल उपाध्यक्ष भारती महाले, संजय शेवाळे गणेश इंगळे, गणेश निकम, विजय पवार, सोनू जगताप, साहेबराव पाटील ढोमसे, धनंजय डुंबरे,छोटुकाका पानगव्हाणे,शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी ४२ गावातील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम करून या उपक्रमांसाठी प्रतिसाद देत सहकार्य केले. जिल्ह्यातील १७ मंडळांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
त्या १७ मंडळांमध्ये लासलगाव भाजपा मंडलाने प्रथम क्रमांक पटकाविला असून या ठिकाणी ५२ रक्त पिशव्या कलेक्शन करण्यात आले. महिलांचे हिमोग्लोबिन कमी असण्याचे कारण शोधून जनजागृती करणे गरजेचे असल्याने भविष्यकाळात महिलांचे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी आपण उपक्रम राबवणार असून या उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे ही आवाहन सौ सुवर्णा जगताप, जिल्हाध्यक्ष भाजपा महिला यांनी केले आहे