वैजापूर भारती कदम
वैजापूर- मित्राने चाकूने वार करून मित्राला जखमी केल्याची घटना शहरात लाडगाव रोडवरील आर आर हाॅटेल मध्ये बुधवारी रात्री घडली.शहरातील रहिवासी नशीर इस्माईल शेख व तौफिक दगू शहा हे दोघे मित्र असून ते जेवण करण्यासाठी हाॅटेल मध्ये गेले होते.तेथे दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. तौफीक हा शिवीगाळ करू लागला.त्यास नशीर हे समजून सांगण्यास गेले असता या वादात तौफीक याने खिशातील चावीच्या चाकूने नशीर यांना वार करून जखमी केले.या प्रकरणी नशीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तौफिक याच्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.