महेश साळुंके/ तालुका प्रतिनिधि निफाड
निफाड- अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्या असल्याने पुढील तीन दिवस पावसाचे अंदाज हवामान खात्याने सांगितले आहे बुधवार दि.१ रोजी सकाळपासून द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील बहुतांशी भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे यामुळे आता अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे सकाळपासूनच वातावरणात बदल झाला एकीकडे थंडीत घसरलेला पारा त्यातच वाऱ्याचा वेग वाढलेला आहे दुसरीकडे अचानक सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्यामुळे द्राक्ष उत्पादक कांदा उत्पादक शेतकरी धास्तावले आहे या वातावरणात शेतमाल खराब होण्याची शक्यता जास्त आहे दुसरीकडे द्राक्षाचे मनी तयार होण्याचा कालावधी असल्यामुळे खराब हवामानाचा विपरीत परिणाम द्राक्ष होणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा द्राक्ष पंढरीत द्राक्ष बागांना व कांद्यांना फटका बसण्याची शक्यता आहे पंधरा दिवसापूर्वी ढगाळ वातावरणसह पावसाने हजेरी लावली आहे द्राक्ष बागाची क्रूज आणि गळ मोठ्या प्रमाणावर झालेली होत होती त्यातूनच शेतकरी सावरतो तोच पुन्हा एकदा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे द्राक्ष आणि कांदा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे काढणीला आलेला कांदा खराब होऊ शकतो तर द्राक्ष मण्यांना उद्या तडे ,भुरी ,डाऊनी, गळ, अशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात लाखो रुपयांचा खर्च करून हाताश आलेली पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकरीची झोप उडाली आहे
प्रतिक्रिया
ढगाळ व रिमझिम पावसामुळे द्राक्ष मन्यांना तडे पडतात व गळण्याचे प्रमाण जास्त प्रमाणावर होते लाखो चा खर्च करून जर अशी परिस्थिती असली तर पीक परत उभे करायचे कसे अशी परिस्थिती आमची झाली आहे तरी शासनाने याकडे लक्ष द्यावे- रोहित शिदे वनसगाव द्राक्ष उत्पादक
पावसाचे प्रमाण कमी जास्त होत आहे यामुळे आम्हाला औषधाची फवारणी एक सारखी करावी लागते या फवारणी ला लाखो चा खर्च येतो परत खर्च वसूल होईल का नाही ही मोठी काळजी असते द्राक्ष पिकवन हे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी झाली आहे सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे -संपत दरेकर विचुंर द्राक्ष उत्पादक