Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नवविवाहीत महीलेने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

 

प्रतिनिधी वैजापूर 

वैजापूर तालुक्यातील घायगांव शिवारातील रहिवासी एका नवविवाहीत महीलेने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली.ही घटना मंगळवारी रात्री घडली.   सुकन्या संभाजी इंगळे (२१) रा. म्हस्की रोड, घायगाव शिवार असे मृत महिलेचे नाव आहे.
     घायगाव शिवारातील म्हस्की रोड येथील संभाजी इंगळे यांचा विवाह ४ एप्रिल २०१८ रोजी झाला होता.त्यांची  पत्नी सुकन्या ही मंगळवारी सकाळपासून बेपत्ता झाली  होती. नातेवाईकांनी परिसरात व नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. मात्र ती मिळून न आल्याने संभाजी याने पत्नी बेपत्ता झाल्याबाबतची माहिती वैजापूर पोलीस ठाण्यात दिली. 

   त्यानंतर ही तिचा शोध सुरू असताना घायगाव शिवारातील शेत गट क्रमांक २६२ मधील एका विहिरीत  महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना असल्याचे नागरीकांना दिसले.  याबाबतची माहिती पोलीसांंना देण्यात आली .यावेळी वैजापूर पोलीसांंनी घटनास्थळी धाव घेत महिलेची ओळख पटविली. सदरील मृतदेह  हा 
सुकन्या हिचाच असल्याची खात्री झाल्यानंतर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रात्री उशिरा मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान सुकन्या हिच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.