भाजपा नेते डॉ. राजीव डोंगरे यांच्या शिष्टमंडळाने उपविभागिय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या पारसनाथ थोरात यांची भेट घेऊन उपोषण सोडवले. |
वैजापूरप्रतिनिधी
कापुसवाडगाव (ता. वैजापूर) शिवारातील गट क्रमांक १६३ मधुन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केलेला रस्ता रेकॉर्डनुसार पंडित आहे. हा रस्ता पारसनाथ लक्ष्मण थोरात यांच्या जमिनीतुन गेला आहे. मात्र त्यांना जमिनीचा मोबदला अद्याप मिळाला नसुन गट क्रमांक ८७ मधील लोकांनी यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे थोरात यांनी गोरख लक्ष्मण थोरात, कृष्णा लक्ष्मण थोरात यांना सोबत घेऊन उपविभागिय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. भाजपाचे नेते डॉ. राजीव डोंगरे, तालुका उपाध्यक्ष प्रभाकर गुंजाळ, प्रवीण सोमवंशी, अनिल सोनवणे, संतोष तागड यांच्या शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांची भेट घेऊन समस्या जाणुन घेतली. त्यानंतर डॉ. डोंगरे यांनी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली. तहसिलदार व उप अभियंता यांनी जायमोक्यावर जाऊन पाहणी व मोजणी करुन थोरात यांना तात्काळ पंधरा दिवसांत रस्ता मोकळा करुन द्यावा असे आदेश उपविभागिय अधिकारी माणिक आहेर यांनी तहसिलदारांना काढले. डॉ. डोंगरे यांनी उपोषण सोडले.