सुधाकर नागरे (दुसरबीड)
मागील काळात मातृतिर्थ सिंदखेडराजा येथुन संघर्ष यात्रेला सुरुवात केली. तुमच्यात मुंडे साहेबांना बघण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माझे दौरे सतत आहेत. मुंडे साहेबांमुळे महाराष्ट्राला सन्मान मिळाला. कर्तुत्वाचा नातं माणसाने जोपासले तर प्रत्येकाला आपला सन्मान मिळतो. कितीही मोठे पद असेल आणि कर्तृत्वच नसेल तर सन्मान मिळत नाही त्यामुळे पदाने नव्हे तर माणूस कर्तृत्वाने मोठा असावा असे प्रतिपादन माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले.
भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तोताराम कायंदे यांच्या अमृतमहोत्सवी व जीवनपटावरील गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्याप्रसंगी 'त्या' बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी मंत्री पंकजाताई मुंडे या होत्या. तर प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री तथा विधानपरिषद आमदार महादेव जानकर, माजी राज्यमंत्री तथा आमदार डॉ. रणजीत पाटील, आमदार नरेंद्र दराडे, माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे, शिक्षक आमदार किरण सरनाईक, माजी खासदार सुखदेव काळे, माजी आमदार सौ.रेखाताई खेडेकर, माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, डॉ.राजेद्र वाघ, देवानंद कायंदे, डॉ खुशालराव मापारी, राम राठोड, अभय चव्हाण, नंदु बोरे, वसंतराव मगर, डॉ.गणेश सानप हे होते.
प्रास्तविक नंतर पंकजाताई मुंडे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तर अमृतमहोत्सव सोहळ्यानिमित्त पंकजाताई मुंडे व इतर मान्यवरांच्या हस्ते माजी आमदार तोताराम कायंदे यांचा सपत्नीक भव्य सत्कार करून त्यांच्या जीवनपटावरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. आ.नरेंद्र दराडे, भारतभाऊ बोंद्रे, आ.रणजित पाटील,आ.महादेव जानकर यांनी मनोगत व्यक्त केले.
पुढे बोलताना पंकजाताई मुंडे यांनी सद्यापरिस्थिती रामराज्याची नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागेल. पदासाठी लाचारी पत्कारणार नाही. संस्कार देतात ते संत, सन्मान देतो तोच नेता. भगवान भक्ती गडावर केलेले आव्हानाची आठवण करुन देत व्यसनमुक्ती, मुलगी जन्माला आल्यावर भगवानभक्ती गडावर भगवानभक्ती धागा बांधावा, तसेच मंदीर, मस्जिद, बौध्द विहारसह प्रार्थनास्थळे यांची स्वच्छता स्व.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमाने गावोगावी राबविण्याचे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजकांना सुचना केल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तोताराम कायंदे मित्रमंडळ व अमृत महोत्सव सोहळा समितीने परिश्रम घेतले. सुत्रसंचलन सिध्देश्वर पवार यांनी तर आभार भास्करराव काळे यांनी मानले.